“महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील शिक्षकांच्या सबलीकरणासाठी दहा दिवसांचा एक आगळा वेगळा आणि आधुनिक प्रशिक्षणाचा उपक्रम”
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्र (UGC-HRDC) व पुण्यातील नामांकित ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इंजिनीरिंग कॉलेज च्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचिंग अँड लरनिंग (CETL) यांच्या सयोंजनाने विद्यापीठात सादर होत असलेल्या १० दिवसांच्या एक आगळ्या वेगळ्या ट्रैनिंग कोर्से चे आज उदघाटन झाले. हे दहा दिवसांचे ट्रैनिंग सत्र महाराष्ट्रातील अभियांत्रिकीच्या शिक्षकांसाठी आयॊजीत केलेले असून ११ मार्च ते २० मार्च या कालावधीत पार पडत आहे. “शिक्षकांच्या सबलीकरणासाठी प्रगत अध्यापनशास्त्र” (अडवान्सड पेडागॉगी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ टीचर) असे या तांत्रिक प्रशिक्षणाचे नाव असून त्यासाठी महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठातील व मराठवाडा विद्यापीठातील सांगली, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोपरगांव, मालेगांव, प्रवरानगर येथून व तसेच पुणे विद्यापीठातील हि बऱ्याच अभियांत्रिकी कॉलेज मधील प्राध्यापक आलेले आहेत.
‘पंडित मदन मोहन मालविया नॅशनल मिशन ऑफ टीचर्स अँड टीचिंग’ या देशभरात झालेल्या मंगल उपक्रमातून निर्माण झालेल्या सावित्री बाई फुले विद्यापीठाच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर हे विद्यालयातील शिक्षकांसाठी नेहमीच असे उपक्रम पार पाडते. या सेन्टरचे दिग्दर्शक डॉक्टर एस ए सोनवणे व ए. आय. एस एस एम एस चे प्राचार्य डॉक्टर डी एस बोरमणे यांच्या प्रयत्नाने प्रथमच असा उपक्रम अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांसाठी पार पडत आहे. या दहा दिवसाच्या उपक्रमाच्या समन्वयक डॉक्टर सौ. मंगल धेंड आहेत. आज याचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्र केंद्राचे समन्वयक डॉक्टर सचिन सुर्वे, एम आय टी कॉलेज च्या गुणवत्ता हमी विभागाचे सहयोगी डीन डॉक्टर रत्नदीप जोशी व कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय बोरमणे समन्वयक डॉक्टर सौ. मंगल धेंड, सहसमन्वयक डॉक्टर एस व्ही चैतंन्य यांच्या उपस्थितीत पार पडले.