शुक्रवार, ०२ जानेवारी २०१५
एआयएसएसएमएसच्या अभियांत्रिकीच्या दीडशे विद्यार्थ्याना नोकरी
पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीडशे विद्यार्थ्यांना नामंकीत कंपन्यांमध्ये नोक-या मिळाल्या असल्याची माहिती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. जितेंद्र खुबानी यांनी दिली.
औद्योगिक क्षेत्रात जागतिक मंदी असताना देखील एआयएसएसएमएसच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याना नोकरी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. टिसीएस, सायबेज, सुझलॉन एनर्जी, फ्लेक्सट्रॉनिक्स, ब्रिजस्टोन, थिसनकृप, कॅस्ट्रॉल, इकॉन अप्लायंसेस, आयसीआयसीआय, आय रिसर्च सर्व्हिसेस, स्टेरिया इंडिया प्रा. लि, इ क्लिनिकल वर्क्स, इट्न टेक्नालॉजी, इंडियन आर्मी, होरायझन टेलिकॉम, डुफ्लॉन इंडस्ट्रिज, इंटेलिमेंट, निहिलेंट, रियाल्टी बिझनेस इंटेलिजेंट्स, पर्सिस्टंट सिस्टिम, पॉलिकॅब वायर, मॅन डिझेल एंड टर्बो, सन्मार ग्रुप अशा कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत श्री छत्रपती शाहू महाराज, उपाध्यक्ष श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, सचिव मालोजीराजे छत्रपती, प्राचार्य डॉ. एस पी दानव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Our College AISSMS COE News was published in 2 news websites mpcnews.in and aplapune.com. Please visit on link http://aplapune.com/Business/detail/61 and http://mpcnews.in/index.php/component/k2/item/5059-2014-12-30-06-07-08